नाशिक – उंटवाडी, तिडकेनगर, खांडे मळा परिसरातील स्ट्रीट लाईटबाबतच्या समस्यांचे निवेदन शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना दिले. कालिका पार्क पाटीलनगर चौकासह अन्य ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याचीही मागणी करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक २४ आणि २५ मध्ये शिवसेनेने समस्या निवारण मोहीम सुरू केली आहे. उंटवाडी, हेडगेवारनगर, पाटीलनगर, दत्तमंदिर परिसर, जगतापनगर, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, खांडे मळा आदी भागात स्ट्रीट लाईटच्या समस्या आहेत. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी अंधार असतो. काही ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्याची व बंद असलेले सुरू करण्याची आवश्यकता आहे. नादुरुस्त फिटिंग्ज्, गंजलेले पोल बदलणे गरजेचे आहे. या सर्व समस्या सोडविण्याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी यांना २२ जुलै रोजी देण्यात आले.
हे निवेदन देण्यापूर्वी बुधवार, दि. १४ जुलै रोजी महापालिका सिडको विद्युत विभागाचे उपअभियंता प्रकाश मोरे, कनिष्ठ अभियंता मोहन गिते, वायरमन सुधीर कुमार यांनी या भागात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्याही निदर्शनास वरील समस्या आणून देण्यात आल्या.शिवसैनिक व सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, श्रीकांत नाईक, ज्ञानेश्वर महाले, यशवंत जाधव, संजय टकले, निलेश ठाकूर, मगन तलवार, राहुल कदम, सचिन जाधव, अनिल दिवटे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, दिलीप दिवाने, दिलीप रौंदळ, बाळासाहेब दुसाने, शैलेश महाजन, सचिन राणे, आशुतोष तिडके, अनंत संगमनेरकर, रेखा भालेराव, ज्योती वडाळकर, साधना कुवर, संगिता देशमुख, ज्योत्स्ना पाटील, सुनीता उबाळे आदींनी वरील समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
येथे हायमास्ट दिवे बसवा
बडदेनगर-पाटीलनगर रस्त्यावर कालिका पार्क पाटीलनगर चौकात मनपसंद स्वीटजवळ, जगतापनगरला मातोश्री चौक, दोंदे पूलाजवळ अनमोल व्हॅली इमारतीसमोर संभाजी व्यायामशाळा चौक यासह तांत्रिकदृष्ट्या शक्य असेल त्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.