नाशिक : पाण्याच्या टाकीत काम करीत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३२ वर्षीय प्लंबरचा मृत्यु झाला. ही घटना पाईपलाईन रोड भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश हरी खाडे ( रा.खाडेवाडी,धोंडेगाव ता.जि.नाशिक) असे मृत प्लंबरचे नाव आहे. खाडे शुक्रवारी (दि.२३) संतकबीर नगर परिसरातील पाटालगतच्या काळेनगर भागात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या चाफेकर बंगल्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत काम करीत असताना ही घटना घडली. ड्रील मशिनच्या सहाय्याने काम करीत असतांना त्यास अचानक इलेक्ट्रीकचा शॉक लागला. ठेकेदार कैलास पाटील यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
…