नाशिक – एलआयसीचे आयपीओ द्वारे खासगीकरण, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची विक्री व संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा संप अधिकार काढून घेणे या केंद्र सरकारच्या निर्णयांना विरोध म्हणून ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे आज २३ जुलै रोजी देशव्यापी निषेध करण्यात आला. विमा कर्मचारी संघटना नाशिकतर्फे सदर निषेध आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देण्यात आला. नाशिक येथील विभागीय कार्यालय जीवन प्रकाश येथे निषेध कार्यक्रम माहिती चा बॅनर लावण्यात आला. सरकारच्या या जनहित व विमेधारकांच्या हित विरूद्ध तसेच अर्थ व्यवस्थेला घातक अशा धोरणांच्या विरोधात देशात व्यापक प्रमाणात जनजागृती करत आंदोलन करण्यात येणार आहे असे कॉ अॅड कांतीलाल तातेड अध्यक्ष, सुनील जोशी उपाध्यक्ष, मोहन देशपांडे सरचिटणीस, अनिरुद्ध देशपांडे सहचिटणीस, प्रिया मटंगे सहचिटणीस, प्रिया जोशी सहचिटणीस, योगेश कासार सहचिटणीस, अनघा यार्दी महिला आघाडी निमंत्रक, अजय डोळस खजिनदार, महेश डांगे सह खजिनदार आदींनी सांगितले.