नाशिक – शहरातील २ खासगी हॉस्पिटलची कोविड मान्यता रद्द, साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूदर जास्त असणाऱ्या ९ खासगी हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णवाढीचा दर अधिक असण्याबरोबरच नाशिकमध्ये मृत्यूच्या दरातही मोठी वाढ झाल्याने हा चिंतेचा विषय ठरला होता. त्यात ही खासगी रुग्णालयांमध्ये मृतांची संख्या अधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील ९ मोठ्या खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग हा ६ ते ८ पटीनं अधिक होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मृत्यूसंख्यादेखील वाढली. शहरातील वाढत्या रुग्णसंख्याबरोबरच मृत्यूची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नाशिक शहरातील मृत्यूसंख्येचा वाढता आलेख चिंताजनक असल्यानं तसच खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या अधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील ९ रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. १ मार्च ते १४ मे २०२१ या काळातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त का आहे ? मृत्युदर जास्त असणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याने संबंधित रुग्णालयांनी याचा खुलासा करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
कोविड मान्यता रद्द
त्याचबरोबर बिलांच्या ऑडिटबाबत वारंवार सूचना देऊनही ते सादर न करणाऱ्या रामालय आणि मेडीसिटी या दोन खासगी हॉस्पिटलची कोविड मान्यता रद्द करण्यात आली असून त्यांच्याविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत.
या हॅास्पिटलला दिली नोटीस