नाशिक – शिवसंपर्क अभियानाअंतर्गत उंटवाडी परिसरात शिवसेनेकडून समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मंगळवारी, १३ जुलै रोजी उद्यानांमधील दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यात आले. तेथील अडचणी दूर करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. जगतापनगर येथील भारतरत्न राजीव गांधी उद्यानातील मोडकळीस आलेली संरक्षक जाळी, कचऱ्यांचे ढीग, तडे गेलेल्या संरक्षक भिंती आदी दुरावस्था निदर्शनास आणून देण्यात आल्या. उंटवाडीतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यानातील चौथऱ्यावरील तुटलेली कौले, फरशा, खेळण्या, संरक्षक जाळी याची पाहणी करण्यात आली. या समस्यांचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे उद्यान निरीक्षक प्रशांत परब यांनी सांगितले. यावेळी शिवसैनिक, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), ज्योती वडाळकर, शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, अनंत संगमनेरकर, शुभम महाले, डॉ. राजाराम चोपडे, संगीता चोपडे, सचिन राणे आदींसह रहिवाशी हजर होते. उद्यानांच्या आतील व बाहेरील कचरा दुसऱ्या दिवशी बुधवारीच उचलण्यात आला. या परिसरातील उद्यानांमधील समस्या दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि उद्यान अधिक्षक शिवाजी आमले यांना निवेदन देण्यात येणार आहे.