नाशिक – समता समाज विकास संस्था ४१ वर्धापन दिन व संस्थेच्या मानद सचिव तथा प्राचार्य मनीषा विसपुते यांचा अभिष्टचिंतन सोहळा आदर्श विद्यामंदिर शाळेत संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक रमेशचन्द्र औटे, संस्थेचे अध्यक्ष धुकररावजी सातपुते, संस्थेचे उपाध्यक्ष निंबा शेठ विसपुते ,संस्थेच्या कोषाध्यक्षा पुष्पलता औटे, शाळेचे समन्वयक रविकिरण औटे उपस्थित होते.
कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी या आनंदी, छानशा सोहळ्याचे प्रक्षेपण गुगलमीट या ॲप द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. याप्रसंगी विसपुते मॅडम आणि मान्यवर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन झाले. संस्थेचे संस्थापक रमेशचन्द्र औटे यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये प्रत्येक व्यक्तीने, आपल्या वाढदिवसाला, एक तरी झाड लावावे आणि ऑक्सिजन वाढवण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले. कोविड काळात ऑक्सिजनच्या अभावी आपल्याला अनेक आपले आप्तजन गमवावे लागले आहे. म्हणून प्रत्येकाने ऑक्सिजन वाढीसाठी तरी झाड लावले पाहिजे असा आग्रह धरला. लवकरच कोविड संपेल आणि शाळेतील चिमणी पाखरं शाळेत किलबिल करतील, शिक्षण घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
शाळेतील उपशिक्षिका कामिनी पवार यांनी यावेळी आपल्या मनोगतातून, अनुभवातून विसपूते मॅडम यांचे जाणवलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व व्यक्त केले. यामध्ये मॅडम नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभ्या राहतात हे सांगितले. सोहळ्याच्या सत्कारमूर्ती विसपुते मॅडम यांनी आपल्या भाषणातून कोरोनाला घाबरायचे नाही ,खंबीर होऊन जगायचे. परंतु त्यासाठी आपल्याला सामाजिक नियमांचे, जसे हात धुणे, मास्क वापरणे व सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त शिक्षणासाठीच करावा, त्याचा दुरुपयोग करून स्वतःचे भविष्य खराब करू नये असा सल्लादेखील विद्यार्थ्यांना दिला. कोविडच्या याकाळात सर्वांनी आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सांभाळली पाहिजे ,असे आवाहन देखील त्यांनी केले .संस्थेच्या भावी योजना बद्दल उल्लेख करताना पॅरामेडिकल आणि नर्सिंगचे कोर्सेस लवकरच सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या काळात अनेक व्यक्तींचे रोजगार बुडालेकारणाने कुटुंबांची वाताहात झाली आहे. त्यासाठी गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतः रोजगार मिळवण्यासाठी सक्षम बनवण्याची देखील त्यांनी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन मोनिका सूर्यवंशी यांनी केले.