नाशिक : कोरोना काळात शहर पोलिसांच्या मदतीसाठी विशेष पोलिस अधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या नाशिक सराफ असोसिएशन व नाशिक क्लॅाथ मर्चंट असोसिएशनच्या कार्याची दखल घेवून शुक्रवारी ( ता. २१) पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या वतीने या दोन्ही असोसिएशनचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी नाशिकचे पोलिस आयुक्त दिपक पांडे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव , जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी लिना बनसोडे व्यासपीठावर उपस्थित होते.
एप्रिल महिन्यात लावण्यात आलेल्या लॅाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारवाडा पोलिसांच्या वतीने सराफ व कपडा असोसिएशनच्या ४५ पदाधिकाऱ्यांना विशेष पोलिस अधिकारी असा दर्जा देण्यात आला असून हे अधिकारी सध्या सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील विविध चेकनाक्यांवर गर्दीवर नियंत्रण व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून चोख ड्यूटी बजावत असल्याचे चित्र दिसून आले आहेत. लॅाकडाऊन सूरु झाल्यापासून अविरत ड्यूटी करणाऱ्या या विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेवून शुक्रवारी धुमाळ पॅांईन्ट येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने या सर्वांचे मनोबल उंचावण्यासाठी कौतुकाची थाप देण्यात आली. यावेळी नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रटरी किशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहूल थोरात, माजी अध्यक्ष चेतन राजापूरकर, योगेश दंडगव्हाळ, सुनील महालकर, कृष्णा नागरे, शाम तांबोळी, पवन महालकर, सुनीता दौंडकर, सुभाष सोनवणे, नासिक क्लॅाथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, निलेश जाजु, हेमंत कुलकर्णी, तुषार मनियार, पवन पारख, मकरंद सुखात्मे, आशीष ठोंबरे, गोटू चोरडिया, गौतम हिरण, प्रसाद चौधरी, मधुसूधन मुंदडा, मकरंद सोनी आदींसह पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
—
गरज असेल त्यावेळेस आमची टीम तयार
गेल्या वर्षीपासून आम्ही सराफ असोसिएशनचे पदाधिकारी पोलिस प्रशासनाला मदत व्हावी या हेतूने कार्य करीत आहेत. व यापुढेही गरज असेल त्यावेळेस आमची टीम या कार्यासाठी तयार असेल.
– गिरीश नवसे
अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन.
….
कठीण काळातही विशेष पोलिस अधिकारी म्हणून सेवा
गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नासिक सराफ असोसिएशनचे पदाधिकारी या कठीण काळातही विशेष पोलिस अधिकारी म्हणून सेवा बजावत असून नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
किशोर वडनेरे
सेक्रटरी, नाशिक सराफ असोसिएशन.