नाशिक – नाशिक महानगर पालिका चे माजी नगरसेवक मदनलाल रावल यांचे वयाचे ८६ व्या वर्षी आज त्यांच्या राहत्या घरी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. नाशिक महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले पंजाबी समूहातील ते पहिले नगरसेवक होते. उद्योजक असलेले रावल स्वतःचा दांडगा जनसंपर्क आणि समाजसेवेच्या बळावर अल्पसंख्य असूनही राजकारणात ठसा उमटवू शकले. त्यांच्या मागे १ मुलगा-सून, जावई, नातू असा मोठा परिवार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांच्यावर आमरधाम नाशिक येथे उद्या (५ जुलै) रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.