नाशिक – रविवार कारंजा येथील सचदे अगरबत्ती दुकानाजवळ शनिवारी सायंकाळी वाडा कोसळल्यामुळे दोन महिला जखमी झाल्या आहे. या दोन्ही महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर वाड्याचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. वाड्यातील १० ते १५ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे..
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जोशी कुटुंबियांचा हा वाडा आहे. काही दिवसांपासून हा वाडा पाडून याठिकाणी खोदकाम सुरु होते. जोशी यांच्या शेजारीच वैश्य कुटुंबियांचा वाडा आहे. सायंकाळी वैश्य कुटुंबीय हॉलमध्ये बसलेले असताना वाड्याची भिंत कोसळली. यादरम्यान, हॉलमध्ये बसलेल्या संगीता अजित वैश्य (५५) आणि रिता वैश्य (२७) या दोन्ही महिला खाली कोसळल्या व त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर विनोद खेमचंद वैश्य यांनी सांगितले की, अनेकदा काम थांबविण्यासाठी जोशी यांना सांगूनही, त्यांनी येथील रहिवाशांचे ऐकले नाही. जोशी यांच्या कामामुळेच वाडा कोसळल्याला आहे. जोशी यांच्यावर कारवाई करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.