शिवसेना, सत्कार्य’तर्फे नागरिकांना, आरोग्यदायी शुभेच्छांसह गुलाबपुष्प भेट
नाशिक – अतिशय उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात शनिवारी सकाळी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्यानंतर घरी परतणाऱ्या नागरिकांना शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या वतीने आरोग्यदायी शुभेच्छांसह गुलाबपुष्प भेट देण्यात आले. निमित्त होते उंटवाडीतील तिडकेनगर, कर्मयोगीनगर येथील छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळेतील माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्राचे शानदार उद्घाटन सोहळ्याचे. यावेळी मिळालेल्या स्नेहपूर्ण शुभेच्छांमुळे नागरिक भारावून गेले होते.
शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने पाठपुरावा केल्यानंतर छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळेत माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्राला महापालिकेने मंजुरी दिली. पुढील सर्व नियोजन रितसर करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन शनिवारी, ३ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नीलेश साळुंखे, सुयश पाटील, शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, फाऊंडेशनचे अध्यक्ष, दैनिक ‘सामना’चे पत्रकार बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर होते.
शनिवारी उद्घाटनानंतर शिस्तबद्धरीत्या लसीकरणाला सुरुवात झाली. लस घेवून घरी परतणाऱ्या नागरिकांना फाऊंडेशनच्या वतीने गुलाबपुष्प व आरोग्यदायी शुभेच्छा देण्यात आल्या. फाऊंडेशनच्या पाठपुराव्यामुळे हे केंद्र सुरू झाल्याने, तसेच येथील उत्कृष्ट नियोजन पाहून रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
या केंद्राची उभारणी आणि उद्घाटन सोहळ्यासाठी शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), तिडकेनगर-कर्मयोगीनगर शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, उंटवाडी-जगतापनगर शिवसेना शाखाप्रमुख मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, मनोज पाटील, यशवंत जाधव, डॉ. राजाराम चोपडे, आशुतोष तिडके, श्रीकांत नाईक, संजय टकले, नानासाहेब खैरनार, विजय कांडेकर, संकेत गायकवाड (देशमुख), बाळासाहेब दुसाने, मगन तलवार, शैलेश महाजन, राहुल कदम, मकरंद पुरेकर, मनोज वाणी, डॉ. शशिकांत मोरे, विनोद पोळ, कांचन महाजन, नीलिमा चौधरी, उज्ज्वला सोनजे, धवल खैरनार, वंदना पाटील, साधना कुवर, संगिता देशमुख, पल्लवी रनाळकर, सरीता पाटील, सुनीता उबाळे, ज्योत्स्ना पाटील, संगिता नाफडे, रेखा भालेराव यांनी परिश्रम घेतले.
अशी आहे व्यवस्था
या लसीकरण केंद्रात नागरिकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्षाची व्यवस्था आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्त्री आणि पुरुषांवरील उपचारासाठी प्रत्येकी दोन असे चार बेड आहेत. प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग स्वतंत्र आहेत. अॅण्टीजेन चाचणीसाठी स्वतंत्र कक्षही उभारण्यात आला आहे.