सोनल दगडे-कासलीवाल यांनी केले आयोजन
नाशिक – शहरात कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावून रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जागतिक योगदिन आणि डॉक्टर्स डेचे औचित्य साधून अर्थ फाऊंडेशन आणि भाजपा उद्योग आघाडीच्या महिला समितीच्या वतीने शहरातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा प्रदेश उद्योग आघाडीच्या सोनल दगडे-कासलीवाल यांनी केले होते.
नाशिक शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढली होती. यावेळी अपुरे बडे व्यवस्था, ऑक्सिजनचा तुटवडा यासारख्या गोष्टींना सामोरे जावून जीवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान झालेलाच नाही. शहरातील सर्वच डॉक्टरांनी या कोरोनाचा अटकाव करण्यासाठी स्वतःसह आपल्या कर्मचाऱ्यांकडून जीवाची बाजी लावून काम केले. यासर्व गोष्टींचा विचार करून डॉक्टर्स डेचे औचित्य साधून हा सत्कार करण्यात आला. आजही डॉक्टर्स कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असून लसीकरणासाठीही पुढाकार घेतांनां दिसत आहे. त्यांचे समाजावर असलेले ऋण हे कधीही विसरता येणार नाही. तरीसुद्धा एक कृतज्ञतेच्या भावनेतून हा सत्कार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी अर्थ फाउंडेशन आणि भाजपा उद्योग आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.