नाशिक – कोरोनामुळे आर्थिक संकट ओढवलेल्या आणि पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनने ‘ज्ञानज्योती घरोघरी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पाच गरजू कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
नाशिक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रविवारी, १३ जून रोजी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते इयत्ता दहावीतील पाच मुलांना वह्या, पुस्तके, कंपास, दप्तर असा संच देण्यात आला. कोरोनामुळे वडीलांचे निधन झालेल्या खुशाल सुकदेव कांबळे याची आई धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. वडीलांचे छत्र गमावलेल्या भूमिका पिंकू बेंडकोळी, कोरोनामुळे नोकरी गेलेल्या कुटुंबातील तन्मय किरण निंबाळकर, मजूरकाम करणाऱ्या कुटुंबातील शुभम संतोष पवार, श्वेता नामदेव जाधव यांना हे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. याप्रसंगी कृषीमंत्री दादा भुसे, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील पाटील, माजी आमदार वसंत गिते, अनिल कदम, राजाभाऊ वाजे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदी उपस्थित होते.
नाशिकच्या तिडकेनगर, कर्मयोगीनगर आणि जगतापनगर, उंटवाडी या दोन शिवसेना शाखा व सत्कार्य फाऊंडेशनने ‘ज्ञानज्योती घरोघरी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. दै. ‘सामना’चे पत्रकार, फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशिला गायकवाड (देशमुख) यांच्यासह कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. समाजातील दानशूरांकडून शैक्षणिक साहित्य स्वीकारून ते गरजू मुलांपर्यंत पोहचविले जात आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, श्रीकांत नाईक, संजय टकले, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, डॉ. राजाराम चोपडे, बाळासाहेब दुसाने, राहुल कदम, सचिन जाधव आदी परिश्रम घेत आहेत.
मदतीचा ओघ सुरूच
मदतीसाठी अनेक दानशूर पुढे आले आहेत. आतापर्यंत मनोज पाटील, सुरेश पाटील, कन्हैय्यालाल ठाकूर, निलेश ठाकूर, संजय टकले, नाना खैरनार, सुनील चौधरी, मयूर आहेर, दीपक दुट्टे, शेखर गजरूशी, विजय कांडेकर यांनी सहकार्य केले आहे. त्यांचे सत्कार्य फाऊंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले. माणुसकीच्या नात्याने सुरू असलेल्या या कार्यात अजूनही अनेकजण पुढे येत असल्याने मदतीचा ओघ सुरूच आहे.