नाशिक- केंद्र शासनाच्या कुटुंब अर्थसहाय योजने अंतर्गत आर्थिक दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील १८ ते ५९ वयोगटातील कर्ता पुरुष मयत झाल्यास त्या कुटुंबाला एकरकमी रक्कम रूपये २० हजार रुपये अनुदान देण्यात येते. कोरोना प्रादुर्भाव काळातही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाने लाभार्थीची चौकशी, कागदपत्रे पडताळणी, कार्यालयीन पुर्तता, कामकाज, पाठपुरावा करून या योजनेच्या तहसीलदार दिपाली गवळी यांनी तब्बल ४२ महिलांना या योजनेचा लाभ संजय गांधी निराधार योजना, मनपा क्षेत्र, नाशिक या कार्यालयात त्यांच्या हस्ते देण्यात आला.अशा बिकट परिस्थितीत ही या योजनेचा लाभ मिळाल्याचा आनंद महिलांनी व्यक्त केला. या योजनेच्या पुर्तीकामी संजय गांधी योजनेच्या तहसीलदार दिपाली गवळी, तलाठी हेमकांत निकम, उपलेखापाल निता शेंडगे, महसूल सहाय्यक अर्चना देवरे, जे.सी.कानडे, उषा सोनवणे आदींनी सहकार्य केले.