खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश
नाशिक : महानगरपालिकेच्या हद्दीतील काही महत्त्वाच्या विकास कामांना विशेष निधी मिळावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरु असलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून महानगरपालिकेच्या क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेंतर्गत तब्बल पाच कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील मुख्य चौकांचे सुशोभिकरण करण्यासह रस्त्यांच्या डांबरीकरणाचे कामे होणार आहे. या निधीमुळे नाशिक महानगरातील विकास कामांना निश्चितच हातभार लागणार आहे.
महानगरातील अनेक कामांसाठी नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार गोडसे यांच्याकडून सततचे प्रयत्न सुरु होते. दरम्यानच्या काळात निधीच्या उपलब्धतेसाठी खासदार गोडसे यांनी दोन वेळेस नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची वैयक्तिक भेट घेतली होती. ठाणे, मुंबई, कल्याण या महानगरांप्रमाणेच नाशिक देखील माझे आवडते शहर असून विकासकामांसाठी मी निश्चितच भरघोस निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही त्यावेळी ना. शिंदे यांनी खा. गोडसे यांना दिली होती. यानंतर खासदार गोडसे यांनी नगरविकास विभागाकडे सततचा पाठपुरावा करुन निधीच्या मान्यतेसाठी केला होता. या सततच्या प्रयत्नांना यश आले असूनआज नगरविकास विभागाकडून काढण्यात आलेल्या विशेष आदेशात नाशिक शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिलेली आहे.
याठिकाणी होणार विकासकामे
-
प्रभाग क्र. २, एन.एस. ३ आडगाव ते विंचुरगवळी फाटा मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करणे (पन्नास लाख)
-
प्रभाग क. १९ मध्ये प्रसाद ध्वनी मंदिर ते खर्जुल सर्कल रस्ता डांबरीकरण करणे. (एक कोटी)
-
प्रभाग क्र. २२, विहितगाव येथे मुख्य रस्ता जेधेरोड मथुरा चौक मुख्य रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (एक कोटी)
-
प्रभाग क्र. २६, डीजीपी नगर, ३ ते खुटवडनगर रस्ता कॉक्रीटीकरण करणे (पन्नास लाख)
-
प्रभाग क्र. १६ शिवाजी नगर येथे ओपन स्पेस सुशोभिकरण करणे (पन्नास लाख)
-
प्रभाग क्र. १६, उपनगर येथे मातोश्री नगर गाडर्नमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी सभामंडप बांधणे, रस्ता काँक्रीटीकरण करणे (पन्नास लाख)
-
प्रभाग क्र. ६ मखमलाबाद गाव सर्वे नं. ४१६ तवली फाटा, डोंगर नागोबा मंदिर रस्ता डांबरीकरण करणे. (एक कोटी)