नाशिक – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सोबतीने शहरातील विविध भागात वृक्षारोपण केले. येत्या १५ दिवसात नाशिक शहरात २१०० वृक्षरोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, शहर सरचिटणीस संजय खैरनार, अंबादास खैरे, धनंजय निकाळे, डॉ.अमोल वाजे उपस्थित होते.
सध्याच्या कोरोना विरोधातील लढाईच्या काळात सर्वांना पर्यावरणाचे महत्व अधिक लक्षात आले असून हवेतील प्राणवायुचे अर्थात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी पर्यावरण रक्षण व संवर्धनाची गरज सर्वांना समजली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादीतील सर्व फ्रंटल व सेल मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून नाशिक शहरात येत्या १५ दिवसात २१०० वृक्षरोपण करणार असून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी संबधित पदाधिकारी व कार्यकर्ता घेणार आहे. नाशिक मधील वातावरण निसर्गरम्य असून चौही बाजूने डोंगराळ भाग व मध्यभागी नाशिक वसले आहे. डोंगराळ भागामुळे नाशिकमध्ये वनक्षेत्र व विविध वनस्पती आढळून येत असतात. यामुळेच नाशिकला थंड हवेचे ठिकाण संबोधतात. परंतु गेल्या दशकापासून वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण यामुळे नाशिकमधील विविध प्रदूषणात वाढ झाली असून नाशिकमधील झाडांची कत्तल सुरु झाली आहे. त्यात विविध प्रकारच्या बांधकामांची भर पडत असून मोठ्या प्रमाणात जमिनीची झीज होत आहे. पाणीची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. परिणामी नाशिकचे वातावरण दमट होऊ लागले आहे. या सर्व बाबींचा विचार करता हवेतील नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याकरिता व नाशिककरांच्या सदृढ आरोग्यासाठी प्रदूषणमुक्त हवा महत्वाची असल्याने झाडांची संख्या वाढविणे गरजेचे असून पावसाळी कालावधीत वृक्षारोपण व संवर्धन करून नाशिक पुन्हा हिरवेगार करण्याचा संकल्प शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केला असून सर्व फ्रंटल व सेलच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी नगरसेवक जगदीश पवार, हरिष भडांगे, शंकरराव पिंगळे, शहर पदाधिकारी बाळासाहेब जाधव, विधानसभा अध्यक्ष किशोर शिरसाठ, बाळासाहेब गीते, विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, जीवन रायते, मकरंद सोमवंशी, शंकर मोकळ, प्रशांत वाघ, सुनिल अहिरे, कुणाल बोरसे, मोतीराम पिंगळे, युवक पदाधिकारी जय कोतवाल, चेतन कासव, संतोष भुजबळ, डॉ.संदीप चव्हाण, राहुल कमानकर, संतोष कमोद, योगेश निसाळ, रविंद्र शिंदे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.