नाशिक – नाशिक येथे शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनने नंदिनी नदी प्रदुषणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज जागतिक पर्यावरण दिनी सिटी सेंटर मॉलजवळ लावलेले होर्डींग खर्याि अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. साक्षात नंदिनी माता प्रकट होवून नाशिककरांना आवाहन करते, असे सुंदर चित्र प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी काढले आहे. प्रदुषणमुक्तीचा जागर करणारे हे होर्डींग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नाशिक शहरातून वाहणारी नंदिनी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नागरिक कचरा टाकत असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेने नदीपात्राला ग्रासले आहे. ही नदी पुन्हा नितळ व प्रवाही व्हावी. नाशिकचे सौंदर्य खुलवणारा असा हा नदीकाठ असावा, वृक्ष – वेलींनी त्याची शोभा अधिक वाढावी यासाठी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नदी प्रदुषणमुक्त करण्याचा संदेश देण्यासाठी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळ एक होर्डींग उभारले आहे, त्यावर प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी काढलेले नंदिनी मातेचे चित्र लक्षवेधक आहे. यात नंदिनी माता प्रकट होवून नागरिकांना केरकचरा नदीपात्रात टाकू नका, रोगराईला आमंत्रण देवू नका असे आवाहन करत आहे. हे चित्र आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी अतिशय बोलके चित्र साकारले आहे. या जनजागृतीपर कार्यासाठी त्यांनी वेळ दिल्याबद्दल सत्कार्य फाऊंडेशनच्या पदाधिकार्यां नी त्यांचे आभार मानले आहेत.