नाशिक – नाशिक आयटी असोसिएशन, भारत विकास परिषद मिडटाऊन नाशिक व सीओईपी माजी विद्यार्थी संघटना नाशिक तसेच जायन्ट्स ग्रुप ऑफ नाशिक, प्राईड यांच्या संयुक्त विद्यमानाने सध्याची महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मधील ऑक्सिजनची टंचाई दूर करण्याकरता नाशिक महानगरपालिकेच्या बिटको हॉस्पिटल मध्ये दोन ऑक्सीजन जनरेशन प्लांटस लावून देण्यात आले आहेत.
या दोन पीसीए ऑक्सिजन जनरेशन प्लांटस मुळे दिवसाला साधारणता ६८ जंबो सिलेंडर इतका ऑक्सिजन तयार होऊ शकेल. हा प्रकल्प सोमवारी सकाळी ११ वाजता नवीन बिटको हॉस्पिटला महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, अशोक कटारिया, अरविंद महापात्रा, उमेश राठी, प्रशांत पाटील, विजय बाविस्कर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, अभियंते व चारही संघटनांच्या मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त कैलास जाधव यांनी चारही संघटनांचे त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. नाशिक महानगरपालिका परिक्षेत्रात लोकसहभागातून उभा राहिलेला हा पहिला प्रकल्प आहे.
या चारही संघटनांच्या सदस्यांनी ऑक्सीजन प्लांट देणगी करताच्या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद दिला व प्लांट खरेदी करता आवश्यक ३८ लाख निधी लगेच जमविला. याव्यतिरिक्त प्लांट च्या मेन्टेनन्स करताही काही निधी जमवला आहे. नवीन बिटको हॉस्पिटल परिसरात प्लांट उभा करण्याकरता नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, डॉ नागरगोजे, अभियंते श्रीचव्हाणके , निलेश साळी यांचे सहकार्य लाभले. या प्रकल्पांकरिता समन्वयक म्हणून प्राचार्य प्रशांत पाटील काम करीत आहेत. अधिक माहिती करता त्यांच्याशी 9545453233 क्रमांकावर संपर्क साधावा. यावेळी अशोक कटारिया, अरविंद महापात्रा, प्रशांत पाटील, अरविंद कुलकर्णी, उमेश राठी, ऋषिकेश वाकदकर, नदीम शेख, मकरंद सावरकर, केतन राठी, विजय बाविस्कर, कैलास पाटील आदि उपस्थित होते.