शिवसेना, ‘सत्कार्य’चे मानले आभार;
नाशिक – नाशिकच्या तिडकेनगरमधील प्रियंका पार्क येथील रस्त्याचे तब्बल सतरा वर्षांनंतर डांबरीकरण करण्यात आले. रहिवाशांनी चकचकीत रस्त्यावर फुले उधळून आनंदोत्सव साजरा केला, ‘शिवसेना झिंदाबाद’चा जयघोष केला. पाठपुरावा केल्याबद्दल शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनचे आभार मानले.
तिडकेनगरच्या प्रियंका पार्कमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे होते. शहरात असूनही अतिदुर्गम भागात राहत असल्यासारखी रहिवाशांची स्थिती होती. तिडकेनगरमध्ये काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले. येथेही डांबरीकरण व्हावे, अशी आग्रही मागणी दै. ‘सामना’चे पत्रकार व सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी केली होती. तरीही तांत्रिक अडचण पुढे करून महापालिका अधिकाऱ्यांनी डांबरीकरण करण्यास टाळाटाळ केली. प्रियंका पार्कसह संपूर्ण परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी शहर अभियंता संजय घुगे यांना २४ मे रोजी निवेदनाद्वारे रहिवाशांच्या वतीने दिला होता. सततच्या पाठपुराव्यानंतर शनिवारी, २९ मे रोजी येथे डांबरीकरण झाले. रहिवाशांनी रस्त्याची पूजा करून फुले उधळून आनंदोत्सव साजरा केला, ‘शिवसेना झिंदाबाद’चा जयघोष केला. शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), महिला आघाडीच्या कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. आर. ओ. पाटील, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, हंसराज वडघुले, बाळासाहेब तिडके, दिलीप तिडके, आशुतोष तिडके, रमेश सूर्यवंशी, मनोज पाटील, डॉ. राजाराम पाटील, डॉ. धनंजय चौधरी, यशवंत जाधव, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. दिग्विजय पाटील, संजय टकले, अरुण ठाकरे, अनिल बोंडे, साधना कुवर, सुरेखा बोंडे, सुनीता उबाळे, नीलिमा चौधरी, पल्लवी रनाळकर, सरिता पाटील, कुसुम खळदकर, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, संगीता देशमुख, संध्या ठाकरे, कांचन महाजन, कल्पना पाटील, कल्पना गाडे, स्वप्ना ठाकूर, सोनाली गीते, संध्या कौर आदींसह रहिवाशी हजर होते.
वनवास संपला
शहराच्या मध्यवर्ती भागात राहत असूनही अतिदुर्गम भागात राहत असल्यासारखे वाटत होते. सतरा वर्षांनंतर डांबरीकरण झाल्याने आता वनवास संपल्यासारखे वाटते. यामुळेच रस्त्याची पूजा करून फुले उधळून आनंदोत्सव साजरा केला. या कामासाठी प्रयत्न केल्याबद्दल बाबासाहेब गायकवाड (देशमुख) व शिवसेनेचे आम्ही आभारी आहोत, अशी भावना सुरेखा बोंडे, साधना कुवर, नीलिमा चौधरी, डॉ. आर. ओ. पाटील यांच्यासह रहिवाशांनी व्यक्त केली.