नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्टॉप अॅण्ड सर्च मोहिमेत पोलीसांनी चॉपरधारीवर कारवाई केली. विनानंबर प्लेट दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला धारदार चॉपर पोलीसांनी हस्तगत केला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहेबाज अजीज कुरेशी (२२ रा.काद्री मज्जीद मागे,बागवानपुरा ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चॉपरधारीचे नाव आहे शहर पोलीसांकडून जागोजागी स्टॉप अॅण्ड सर्च मोहिम राबविण्यात येत असून गुरूवारी (दि.२३) रात्री सरकारवाडा पोलीस कॅनडा कॉर्नर भागात वाहनतपासणी करीत असतांना संशयित पोलीसांच्या जाळय़ात अडकला.
विना नबर प्लेट दुचाकी चालविणा-या संशयितास अडवून पोलीसांनी तपासणी केली असता त्याच्या ताब्यातील दुचाकीच्या डिक्कीत धारदार चॉपर मिळून आला. पोलीसांनी शस्त्रासह दुचाकी जप्त केली असून अधिक तपास जमादार राजपूत करीत आहेत.