नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने सातपूर येथील प्र. क्र. २७ दत्तनगर परिसर, मारूती संकुल परीसर, कारगीलचौक, माऊली चौक, दातीर वस्ती, मुकेशभाई पटेल शाळा, आनंद वाटीका परिसर, तुळजाभवानी चौक, बुध्वविहार परीसरात दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर निवेदन प्रसिध्द केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, चुंचाळे पंपींग स्टेशन येथे पाईप लाईन लिकेज असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार सदर ठिकाणचे काम हाती घ्यावयाचे आहे. सदर ठिकाणी असलेला नॉन रिटन व्हॉल्व खाली असलेले काँक्रीट तोडून टेल पीस टाकणे व त्यानंतर पुन्हा काँक्रीट ब्लॉक भरणे आवश्यक आहे, सदर काम मोठ्या स्वरूपाचे असल्याने नविन नाशिक व सातपूर प्रभागातील पाणी पुरवता गुरुवार १६ ते १७ जानेवारी रोजी खाली नमुद केलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे १८ जानेवारी रोजी होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची प्रभागातील नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता,-2
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा) यांनी केले आहे.
नविन नाशिक- प्र. क्र. २७ चुंचाळे घरकुल योजना
सातपूर – प्र. क्र. २७ दत्तनगर परिसर, मारूती संकुल परीसर, कारगीलचौक, माऊली चौक, दातीर वस्ती, मुकेशभाई पटेल शाळा, आनंद वाटीका परिसर, तुळजाभवानी चौक, बुध्वविहार परीसर