इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनने सुरू केलेल्या कृत्रिम तलावात गणेश विसर्जन व मूर्ती संकलन उपक्रमाला कर्मयोगीनगर येथे तिसर्या वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाजत-गाजत, गुलाल उधळत येत हजारो रहिवाशांनी अभूतपूर्व उत्साहात गणेश विसर्जन केले. सुमारे तीन हजार आठशेहून अधिक मूर्ती आणि दोन ट्रॅक्टर निर्माल्य संकलीत करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महापालिका अधिकारी, कर्मचारी रात्री उशीरापर्यंत येथे कार्यरत होते.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या संकल्पनेतून सन २०२१ मध्ये कर्मयोगीनगर येथे छत्रपती राजे संभाजी महाराज व्यायामशाळेजवळ कृत्रिम तलावात गणेश विसर्जन व मूर्ती संकलन उपक्रम सुरू करण्यात आला. दुसर्या वर्षी सन २०२२ पासून महापालिकेने या ठिकाणच्या या उपक्रमाला अधिकृत मान्यता दिली व सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रतीवर्षीप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता विसर्जन कुंडाचे विधीवत पूजन करून विसर्जनाला सुरुवात करण्यात आली. रात्री दहा वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात विसर्जन सुरू होते. रात्री साडेअकरा वाजता शेवटच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
माजी आमदार नितीन भोसले यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत आपल्या घरच्या बाप्पाचे विसर्जन येथे केले. कर्मयोगीनगर, तिडकेनगर, गोविंदनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, पाटीलनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर, हेडगेवारनगर, त्रिमूर्ती चौक आदी परिसरातील हजारो गणेशभक्तांनी येथे येवून मूर्ती दान केल्या. महापालिका नवीन नाशिक विभागीय अधिकारी मयुर पाटील, बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत पठे, शाखा अभियंता जगदीश रत्नपारखी हे नियोजनावर लक्ष ठेवून होते. दिलीप हांडोरे, हिरामण दातीर, विनोद बिडवई, रंगनाथ गुंजाळ, राजेंद्र कुवर, शंकर घुले, संतोष गायकवाड, किशोर जगताप यांच्यासह कर्मचारी हजर होते.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, मनोज पाटील, मनोज वाणी, अशोक पाटील, निंबा अमृतकर, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, संदीप महाजन, आनंदा तिडके, मगन तलवार, मीना टकले, वंदना पाटील, वैशाली चौधरी, भारती गजरूषी, रूपाली मुसळे, संध्या बोराडे, दीपक दुट्टे, सुरेश पाटील, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, बापू आहेर, हरिष काळे, अशोक चौधरी, संकेत गायकवाड (देशमुख), प्रथमेश पाटील, मयुर ढोमणे, संदीप गहिवाड, शिवाजी मेणे, सचिन राणे, मनोज बागुल, परेश येवले, घनश्याम सोनवणे, घनश्याम पाटील, शेखर राणे, योगेश सपकाळ, सोमनाथ काळे यांच्यासह गणेशभक्त रहिवाशांनी मूर्ती विसर्जन व संकलनासाठी परिश्रम घेतले. महापालिकेचे आभार मानण्यात आले.
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या घोषणांनी दिवसभर परिसर दणाणून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर मिरवणुकीने आलेले गणेशभक्त भगवा डौलाने फडकवत होते. गणपती बाप्पाला निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. मिरवणुकीत गणेशभक्तांनी लेझीम व फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. कर्मयोगीनगर येथील ओपेल इनक्लूव्हचा बैलगाडीतून आलेला बाप्पा, मयुर विहार कॉलनीतील भगवा फडकवत आलेली मिरवणूक, श्रीजी स्काय ग्रीन सदस्यांच्या फुगड्या, शिस्तबद्धता, समृद्धी पार्कसह अन्य हौसिंग सोसायट्या व गणेश मंडळांच्या सदस्यांची भगवे, गुलाबी फेटे यासह एकसारखी वेशभूषा लक्षवेधी ठरली. अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. शांततेत, उत्साहात विसर्जन करण्यास सहकार्य केल्याबद्दल शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने रहिवाशी व प्रशासकीय यंत्रणांचे आभार मानले आहे.