नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी गटाचा पदाधिकारी, माजी नगरसेवकाच्या दबावाखाली हटविलेला ‘कर्मयोगीनगर’चा फलक अखेर महापालिकेने पुन्हा त्याच ठिकाणी लावला. प्रशासनाचे आभार मानत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने बुधवारी फुले उधळून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी प्रभाग क्रमांक २४ मधील शेकडो नागरिक हजर होते.
महापालिकेच्या मान्यतेने, आर डी ग्रुपच्या सीएसआर फंडातून, शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या आंदोलनाने व पाठपुराव्याने कर्मयोगीनगर येथे सेल्फी पॉईंट व जॉगिंग ट्रॅक साकारण्यात आला. सत्ताधारी गटाचा पदाधिकारी असलेल्या माजी नगरसेवकाने महापालिका प्रशासनावर दबाव टाकून या कामाची संकल्पना चोरताना श्रेयही स्वत:कडे घेतले. सोमवारी, १४ ऑगस्ट रोजी हुकुमशाहीने लोकार्पण घडवून आणले. याचवेळी कर्मयोगीनगर नावाचा फलक हटवून कर्मयोगीनगरची ओळखच पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. आठ दिवस होवूनही येथे हा फलक लागलाच नाही. हा फलक पुन्हा लावावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने नागरिकांनी दिला होता. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर आणि शहर अभियंता नितीन वंजारी यांना २१ ऑगस्ट रोजी याबाबतचे निवेदन देण्यात आले.
प्रशासनाने त्वरित दखल घेत २२ रोजीच या ठिकाणी कर्मयोगीनगरचा फलक पुन्हा लावला. आज बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी रहिवाशांनी या फलकाचे पूजन केले. फुले उधळून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला. महापालिका प्रशासनाचे आभार मानले. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विठ्ठल देवरे, विनोद पोळ, डॉ. शशीकांत मोरे, उज्ज्वला सोनजे, मीना टकले, प्रतिभा देशमुख, वंदना पाटील, बापूराव पाटील, ओमप्रकाश शर्मा, कृष्णाजी विसाळे, दिलीप निकम, बाळासाहेब देशमुख, नीलेश ठाकूर, चंद्रशेखर गोर्हे, अशोक सोनवणे, अरुण लांबट, माधव माळी, अशोक जाधव, डॉ. संजय महाजन, नानासाहेब जगताप, विजय पैठणकर, अशोक गाढवे, मगन तलवार, वसंत चौधरी, शिवाजी मेने, सचिन अमृतकर, योगेश नेरकर, योगेश पाखले, रवी भामरे, संदीप गहिवाड, सुनील नेरकर, दीपक जाधव,
प्रदीप पिहुलकर, सुनील देशमुख, पांडुरंग जयसिंगघाग, शशीकला धारणकर, मंदाकिनी कौलगीकर, शैला कारेगावकर, माया पाटील, निर्मला कदम, सुनंदा पाटील, उमा पांडे, सुनंदा आहिरे, इंदिरा माळी, सुनंदा बहिरट, शोभा सावकार, लताबाई भामरे, मंगला बच्छाव, संध्या शिंदे, मंदाकिनी सानप, शैला बागडे, उषा पैठणकर, रत्ना कोठावदे, मिनाक्षी पाटील, सुशीला पाटील, लता चौधरी, मालती कोलते, देवयानी कुलकर्णी, श्रद्धा इंगळे, सुचित्रा आहेर, देवयानी खैरनार, वंदना बागुल, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ, महिला हास्य क्लब, महिला योगा क्लबच्या पदाधिकारी यांच्यासह शेकडो नागरिक हजर होते. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘सत्कार्य फाउंडेशन, रहिवाशांच्या एकजुटीचा विजय असो’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
nashik city news