नाशिक – सातपुर पाणी पुरवठा विभागातील १००० मी.मी. व्यासाची डी.आय. पाईपलाईन काकड मळा, डीपी रोड येथे अचानक गळती सुरु झालेली आहे. सदरील पाणी गळतीमुळे पाणी वाया जात असुन नागरीकांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. तरी पाईप लाईनची दुरुस्ती शनिवार २८ मे २०२१ रोजी सकाळी ९ वाजे पासून हाती घ्यावयाचे असल्याने शनिवारी प्रभाग क्रमांत. २६ मध्ये खालील ठिकाणी दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.
म्हाडा कॉलनी, गोदावरी नगर, पाटील पार्क, जाधव संकुल, (खालचे व वरचे) मेदगे नगर, आशीर्वाद नगर, बंदावणे मळे परिसर, रिगालिया टॉवर इत्यादी परिसरात दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तरी याची नागरिकांनी नोंद घ्यावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे निवेदन महानगरपालिकेने प्रसिध्दीस दिले आहे.