नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने नाशिकला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्याची दखल शिक्षण विभागानेही घेतली आहे. शाळांना सुटी जाहीर करावी का, यासंदर्भातील प्रश्न पालकांसह शाळांकडून विचारला जात आहे. याबाबत आता नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
धनगर यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाचे प्रमाण पाहता, परिस्थिती अशीच असल्यास, परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनी शाळेस सुटी देण्याचा निर्णय घ्यावा. सुटी दिल्यास नंतर अभ्यास आणि शालेय कामकाजाचे दिवस भरुन घेण्याची दक्षता घेण्यात यावी, असे धनगर यांनी निर्देशित केले आहे. दरम्यान, शहरातील काही शाळांनी सुटी जाहीर केली असून काही शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याचे जाहीर केले आहे.
Nashik City IMD Heavy Rainfall Alert School Holiday Decision