नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलतानपुरा भागात विनापरवानगी पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात एका विरूध्द भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशफाक गुलामगैस कोकणी (रा.विठ्ठल मंदिरामागे, मुंजोबा बोळ, मुलतानपुरा, कोकणीपुरा) असे बेकायदा झाडांच्या फांद्या तोडणा-या संशयिताचे नाव आहे. कोकणी यांनी गेल्या २८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास आपल्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडल्या.
या फांद्या तोडण्यासाठी त्यांनी महापालिका अथवा अन्य शासकिय कार्यालयातून परवानगी घेतली नाही. याप्रकरणी संजय ओहोळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक सुर्यवंशी करीत आहेत.