नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड लिंकरोड आणि वंजारवाडी भागात पाच दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात एका महिलेचा समावेश असून उर्वरीतांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. संशयिताकडू देशीसह गावठी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड लिंकरोडवरील घरकुल योजना भागात दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.२१) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला असता सुनिता राजू आहिरे (३५ रा.बिल्डींगनं.८ घरकुल योजना अंबड) या महिलेस रंगेहात पकडण्यात आले. संशयित महिला बिल्डींगनं. १० जवळील पत्र्याच्या आडोशाला बेकायदा दारू विक्री करीत होती. तिच्या ताब्यातून ९१० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलिस शिपाई शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरी कारवाई वंजारवाडी भागात करण्यात आली. बाळू सुकदेव जाधव (४२),शंकर नामदेव मोरे (४९),बाळू नामदेव मोरे आणि शंकर महादू पावडे (रा.सर्व लालवाडी,वंजारवाडी) आदी गुरूवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास लालवाडी येथील एका पत्र्याच्या शेडखाली गावठी दारू बाळगतांना मिळून आले. त्यातील बाळू मोरे आमि शंकर पावडे पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाले असून उर्वरीत दोघांना अटक करण्यात आले आहे. या कारवाईत प्लॅस्टीक कॅनमधील गावठी दारू व रोकड असा सुमारे १ हजार ४८० रूपयांची मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सुनिल जगदाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार पाचोरे करीत आहेत.
..