नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेबरोबर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एकास पोक्सो कायद्यान्वये न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजाराचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अब्दुल हुसेन शेख (४० रा.रोकडोबावाडी, उपनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना ४ जानेवारी २०२२ रोजी जयभवानीरोड भागात सकाळच्या सुमारास घडली होती. मुलगी सोसायटीच्या आवारात खेळत होती. त्यावेळी शेखने या मुलीला बोलवून चॉकलेटचे आमिष दाखविले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिग अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विशेष व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. एस.एस.खरात यांच्या कोर्टात हा खटला चालला. उपनिरीक्षक विकास लोंढे यांनी या गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते. विशेष सरकारी अभियोक्ता अपर्णा पाटील व सहाय्यक सरकारी अभियोक्ता विद्या चव्हाण यांनी या खटल्याचे काम पाहिले असता न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांनी दिलेल्या साक्षी तसेच तपासी अधिका-यांनी सादर केलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून पोस्को अधिनियम ८ मध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड तर अधिनियम १२ अन्वये १ वर्ष ६ महिने १४ दिवसांचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.