नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील पहिल्या आरोग्यवर्धिनी केंद्राचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात रूपांतर करून चुंचाळे घरकुल शिवार, अंबड येथे त्याची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी मा. पालकमंत्री दादा भुसे व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत सदर दवाखान्याचे मा. मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे दृकश्राव्य पद्धतीने लोकार्पण करणार आहेत.
शहरी भागातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी व आरोग्य निर्देशांक वाढविण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची राज्यात स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील ३४२ तालुक्यात एक मे रोजी हे दवाखाने कार्यरत होणार आहेत.
चुंचाळे घरकुल शिवार येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मा. आमदार देवयानी फरांदे, मा. आमदार सीमाताई हिरे, मा. आमदार राहुल ढिकले, मा. आमदार सरोज अहिरे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डी. गंगाथरण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल व इतर अधिकारी आणि सन्माननीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
आपला दवाखान्यात मिळणाऱ्या सेवा
१. बाह्य रुग्णसेवा (वेळ दुपारी २ ते रात्री १०)
२. मोफत औषधोपचार
३.मोफत तपासणी
४.टेली कन्सल्टेशन द्वारे तज्ञांचा सल्ला
५.गर्भवती मातांची तपासणी
६.लसीकरण
७. बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय
८.महिन्यातून निश्चित केलेल्या दिवशी नेत्र तपासणी
९.मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा
१०.आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना', 1 मे रोजी मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे उदघाटन
शहरातील पहिल्या आरोग्यवर्धिनी केंद्राचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात रूपांतर करून चुंचाळे घरकुल शिवार, अंबड येथे त्याची उभारणी करण्यात आली आहे. pic.twitter.com/G82Zaqrh11
— mynmc (@my_nmc) April 29, 2023
Nashik City First Balasaheb Thackeray Apla Davakhana