नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवैज्ञानिक पद्धतींनी ई-कचऱ्याची हाताळणी केल्याने हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण होते ज्यामुळे मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर घटक परिणाम होत असतात. तेव्हा आपण वर्तमान आणि येणाऱ्या पिढीलाही जबाबदारपणे ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बाबत जागरूक करून पर्यावरण संरक्षणाच्या संरक्षणार्थ Computer Society of India (CSI) नाशिक चॅप्टर, पूर्णम इकोव्हिजन पुणे आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून “ई-यंत्रण” ही ई-कचरा संकलन मोहीम २४ ते २६ जानेवारी २०२३ दरम्यान राबविण्यात आली होती.
मोहिमेचा शुभारंभ १२ जाने. २०२३ रोजी नासिक महानगर पालिकेचे आयुक्त माननीय चंद्रकांत पुलकुंडवार यांचे हस्ते करण्यात होता. या मोहीममध्ये नाशिक ९० हुन अधिक मधील शैक्षिणक, औद्योगिक संस्थांनी सहभाग नोंदविला होता आणि जवळपास ३०० स्वयंसेवकानी मदतकार्य केले होते. यासर्वांच्या प्रयत्नांतून साडे चार टन ई कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
संकलित झालेल्या ई कचऱ्यापासून शक्य तितक्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साधनांची पुनर्बांधणी, पुनर्र्चना करून संगणकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. २७ एप्रिल या Computer Society of India (CSI) नाशिक चॅप्टरच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून, हे सांगणं नासिक मधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना देणगी म्हणून देण्यात आले. यामध्ये विशेष मुलींसाठी कार्य करणारी घरकुल परिवार संस्था, पिंपळगाव बहुला, श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय., नाशिक आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅब या संस्थांचा समावेश होता.
या तीन संस्था मिळून एकूण दहा संगणक सिस्टिम देण्यात आल्या. तसेच यावेळी ई-यंत्रण मोहीमेत लक्षणीय सहभाग नोंदविणाऱ्या संस्थांनांही गौरविण्यात आले. यात क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, सपट अभियांत्रिकी महाविद्यालय, चांदवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, रिलायबल ऑटोटेक नासिक. SWS फायनॅन्शिअल प्रा. लि. इलूमिनस टेक्नॉलॉजी आदी संस्थांना गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभय कुलकर्णी, चेअरमन, नाशिक फर्स्ट, संजय चावला, सेक्रेटरी, कॅन हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी Computer Society of India (CSI) नाशिक चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. नीता देशपांडे, सेक्रेटरी डॉ. राजीव भंडारी, पुर्णम इकोव्हिजनचे संचालक राजेश मणेरीकर, संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपथित होते.
Nashik City E Waste Collection Management