नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यात तब्बल तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच मुसळधार पाऊस होत आहे. या हंगामातील हा पहिलाच पाऊस आहे. या पावसाने शेतपिकांना जीवदान दिले आहे. तसेच, जिल्ह्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू आहे. पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरणातून पूर विसर्ग दुपारी १ वाजेपासून ५०० क्युसेकने सोडण्यात येत आहे. गंगापूर धरण विसर्ग संध्याकाळी ६ वाजता ४०७४ क्यूसेक्स होता. रात्री ८ वाजता २२०८ क्यूसेकने वाढवून एकूण ६२८२ क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाचा जोर राहिल्याने विसर्ग टप्याटप्याने वाढविण्यात येत आहे. तर, नांदूरमध्यमेश्वर धरणातून सायंकाळी ६ वाजेपासून ४८४२ क्सुसेकने विसर्ग करण्यात आला आहे. तर, रात्री ८ वजेपासून हा विसर्ग १११५२ क्युसेक केला जाणार आहे. तशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर आला आहे. या पुरामुळे रामकुंड परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे पूरस्थितीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
पालखेड धरण व समूहाच्या पाणलोट क्षेत्रात (दिंडोरी तालुका) झालेल्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोळवण नदीला पूर आला आहे. परिणामी, पालखेड धरणातून कादवा नदीत १५०० ते २००० क्युसेक पर्यंत विसर्ग सुरू करण्यात आला आहे.. तरी नदी तीरावरील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागाने केले आहे.
Nashik City District Very Heavy Rain Godavari Flood
Dam Discharge