नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धान्य वितरण अधिकारी कार्यालय, नाशिक कार्यक्षेत्रातील रद्द असलेले, राजीनामा दिलेले व विविध कारणांमुळे अकार्यान्वित असलेल्या रास्तभाव दुकानांच्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकांनासाठी शासन निर्देशानुसार दुकान परवाने मंजूर करण्यासाठी जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रास्तभाव दुकाने परवाने घेण्यासाठी इच्छुकांनी 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिकचे धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी कले आहे.
प्रस्तावित रास्तभाव दुकान कार्यक्षेत्रातील याद्या, नियम, अटी व शर्ती सह सविस्तर जाहिरनाम्याची प्रत धान्य वितरण अधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हापुरवठा कार्यालय, नाशिक तसेच नाशिक जिल्ह्याचे अधिकृत https://nashik.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अशी आहेत प्रस्तावित रास्तभाव दुकानांची नावे
अ.क्र प्रस्तावित रास्तभाव दुकानाचे कार्यक्षेत्र दुकान क्रमांक
- सुंदरनगर मंदिराजवळ, पुजारीवाडा, रविवार पेठ दुकान क्रमांक 8
- 3370, चव्हाटा, जुने नाशिक दुकान क्रमांक 25
- राजवाडा, देवळाली गाव, नाशिकरोड दुकान क्रमांक 44
- महात्मा गांधी रोड, खोडदे निवास, देवळालीगाव, नाशिकरोड दुकान क्रमांक 46
- सुभाषरोड, नाशिकरोड दुकान क्रमांक 47
- देवी चौक, शिवाजीरोड, नाशिकरोड दुकान क्रमांक 51
- सिन्नर फाटा स्टेशनवाडी, नाशिकरोड दुकान क्रमांक 58
- प्रसाद सर्कल, आकाशवाणी केंद्राजवळ, गंगापूररोड नाशिक दुकान क्रमांक 71
- पांजरपोळ, पंचवटी नाशिक दुकान क्रमांक 127
नवीन दुकांनाकरीता प्राप्त झालेल्या अर्जांची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही 01 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 01 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत नवीन दुकानांना मंजुरी देण्यात येणार आहे, असेही धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.
नाशिक जिल्ह्यात येथे आहे संधी (तालुकानिहाय संख्या)
नाशिक ग्रामीण २८, मालेगाव ग्रामीण २५, मालेगाव शहर ७, चांदवड १२, देवळा २, त्र्यंबकेश्वर २१, कळवण २०, पेठ १२, सिन्नर १८, इगतपुरी २३, बागलाण १९, दिंडोरी ३०, येवला १३, निफाड ४८, नांदगाव ९, सुरगाणा २५. एकूण ३२१