नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर नाशिक शहरात किंवा जिल्ह्याच्या भागात राहणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. महावितरण विभागाकडून सलग दोन दिवस म्हणजेच ९ आणि १० सप्टेंबर (शनिवार व रविवार) वीज पुरवटा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे आताच यासंदर्भातील नियोजन तुम्हाला करावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने दिलेल्या माहिती नुसार, काही अत्यंत तातडीच्या मनोरा उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. किंवा वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यात विलंब होणार असल्याचे कंपनीने कळविले आहे.
या भागात पुरवठा राहणार बंद (दिनांक आणि वेळ)
शनिवार, ९ सप्टेंबर २०२३… वेळ – सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत
रविवार, १० सप्टेंबर २०२३… वेळ – सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजपर्यंत
ओझर, आडगाव, म्हसरुळ, सिन्नर, अंबड, रामाचे पिंपळस, टाकळी
Nashik City District Electricity Supply Shut Down
Two Days MSEDCL Mahapareshan Saturday Sunday