नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव शिवारात घराच्या छतास पीओपी करीत असतांना पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. अलतमस खान (२२ रा. संजीवणी लॉन्स जवळ, नांदूरनाका) असे मृत कामगाराचे नाव आहे. खान यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ही घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खान सोमवारी (दि.७) आडगाव शिवारात राहणारे संतोष माळोदे यांच्या बंगल्याच्या छतास सजावटीसाठी पिओपीचे काम करीत असतांना ही घडली. छतास पिओपी लटकवत असतांना अचानक चक्कर आल्याने सीडीवरून तो पडला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ठेकेदार मोहम्मद चौधरी यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक देसाई करीत आहेत.
लॉटरीच्या आमिषाने वृद्धास लाखोंचा गंडा
वडाळा पाथर्डी रोडवरील सिमेन्स कॉलनीत राहणा-या वृध्देला लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तब्बल साडे चार लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. वेगवेगळया कारणांची बतावणी करीत ही रक्कम बँक खात्यांमध्ये भरण्यास भाग पाडले. या फसवणूक प्रकरणी सरला गर्गे (८९) या वृध्देने तक्रार दाखल केली असून सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, ३ एप्रिल रोजी भामट्यांनी वृध्देशी संपर्क साधला होता. तुमच्या पतीस कोट्यावधींची लॉटरी लागल्याचे सांगत भामट्यांनी वृध्देचे अभिनंदन केले होते. याबाबत त्यांना ई मेल पाठविण्यात आला होता. यानंतर संबधीतांनी त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधत या ना त्या कारणाने त्यांना एचडीएफसी बँकेच्या ५०१००३१३३८१६९९ व ५०१००५१०९०९४४१ या खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले. अठरा दिवसांच्या कालावधीत गर्गे यांनी तब्बल ४ लाख ३८ हजार २०० रूपयांची रक्कम भरली. मात्र त्यानंतर संबधीताचा संपर्क तुटल्याने गर्गे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten