नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील एका महिलेस भामट्यांनी १५ लाखास गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवत ही फसवणुक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडा कॉर्नर भागात राहणा-या प्रिती कांबळे यांनी तक्रार दाखल केली आहे. कांबळे या इंटरनेटवर गुंतवणुकीसह घरी बसून पैसे कमविण्याचा मार्ग शोधत होत्या. गेल्या २५ एप्रिल रोजी भामट्यांनी त्यांच्याशी ९५४१०५०७८८ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी गुंतवणुकीसह विविध कारणे देत वेगवेगळ्या कमाईचे सल्ले दिले. त्यामुळे कांबळे यांचा विश्वास बसला.
त्यानंतर संशयितांनी वेगवेगळया टेलिग्राम चॅनलवरून वेगवेगळया बँक खात्यात सुमारे दहा लाखाची रक्कम युपीआय द्वारे पाच लाखाची रक्कम भरण्यास भाग पाडले. या घटनेत १५ लाख आठ हजार ८६१ रूपयांची फसवणुक करम्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.