नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सायबर भामट्यांनी कार बक्षीस लागल्याची बतावणी करीत शहरातील एका वृध्दास अडीच लाख रूपयाला गंडा घातला. या फसवणूक प्रकरणी अभिमन्यू नामदेव माळी (६२ रा. मेट्रो झोन समोर,पाथर्डीरोड इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली असून सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूक बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माळी यांच्याशी गेल्या मे महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. ८२७२९८८२६८ या मोबाईल धारकाने माळी यांच्याशी संपर्क साधत नेक्सा कंपनीची कार बक्षीस लागल्याचे सांगून अभिनंदन केले होते. यानंतर माळी यांचा विश्वास संपादन करीत भामट्यांनी विम्यासह विविध कारणांची बतावणी केली.
त्यानंतर ७९८०९७८७२६,८२७२९८८०६८,९०३८२६१९८७,८२०८९५६७९१ व ९८०९७८७२६ आदी मोबाईल क्रमांकावर १८ ते २६ मे या काळात फोन पे च्या माध्यमातून त्यांना तब्बल अडीच लाख रूपये भरण्यास भाग पाडले. तीन महिने उलटूनही कार व पैसे न मिळाल्याने माळी यांनी संशयितांशी संपर्क साधला असता तो होवू न शकल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Cyber Crime Car Prize Cheating