नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड पाठोपाठ किरकोळ वादातून गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवाजी नगर भागात एकाचा चाकूने वार करुन खून करण्यात आला. विश्वकांत उर्फ बबलू भीमराव पाटील (२७) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये खूनाचे सत्र सुरुच असून नागरिकांमध्ये सतत घडणा-या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मित्राची बाजू का घेतो? या किरकोळ वादातून दोन जणांनी मिळून हा खून केला. ही घटना शनिवार रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी समशेद रफिक शेख व दीपक अशोक सोनवणे या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले आहे. त्यानंतर या प्रकरणातील आऱोपींना ताब्यात घेण्यात आले.
गुरुवारीच सिडको परिसरात भरदिवसा जुन्या वादातून भाजी विक्रेते संदीप आठवले (वय २२) या तरुणाचा खून जुन्या सिडकोतील लेखा नगर येथील शॉपिंग सेंटर चौकात झाला होता. दुचाकीवरुन हे सर्व हल्लेखोर आले. त्यांनी भाजी विक्रेता आठवले याच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला. पोटात आणि मानेवर जोरदार वार करण्यात आल्याने आठवले याचा जागीच मृत्यू झाला. सिडकोत सलग तीन गुरुवारी हत्येच्या घटना घडल्या. त्यानंतर आता गंगापूर पोलिस हद्दीत ही घटना घडली आहे.
असा उघड झाला बनाव
हल्ला करणाऱ्या मित्राने जखमी मित्राचा अपघात झाला असल्याचा बनाव करून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र पोलीस चौकीतील कर्मचारी पी. एस. जगताप आणि शरद पवार यांना संशय आल्याने त्यांनी समशेर रफिक शेख आणि दीपक अशोक सोनवणे यांनी कसून चौकशी केली. यात चौकशीत या दोघांनी दारूच्या नशेत हल्ला केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
गुप्तीने वार
दोन दिवसांपूर्वी मित्र मित्रा मध्ये शिवीगाळ होऊन वाद झाले. आणि एक मित्राने शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली म्हणून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना घडली. शनिवारी रात्री सातपूर येथील कार्बन नाका येथील महादेव मंदिराजवळ समशेर शेख आणि दीपक सोनवणे आणि मयत विश्वनाथ सोनवणे पाटील हे दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी तिघांमध्ये काही वाद झाले यानंतर समशेर शेख याने जवळच असलेल्या गुप्तीने विश्वनाथ याच्यावर हल्ला केला यानंतर समशेर आणि दीपक यांनी त्याला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Youth Murder Satpur