नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक परिसरातील कुंभारवाडा भागात चार जणांच्या टोळक्याने जुन्या वादाच्या कारणातून दोघा मित्रांना बेदम मारहाण करीत एका तरूणावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी याप्रकरणी उद्देश मुन्ना कासार (२१ रा.कुंभारवाडा,काझीगडी) या युवकाने तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.
आदित्य उर्फ आद्या, लखन पवार, स्वयंम गोसावी व आमले अशी तरूणावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. कासार व त्याचा मित्र कल्पेश उर्फ सोन्या मनोज झगडे (२२ रा.कुंभारवाडा) हे दोघे मंगळवारी (दि.२७) रात्री चौकात उभे असतांना ही घटना घडली. संशयित टोळक्याने दोघा मित्रांना गाठून जुन्या वादाची कुरापत काढून बेदम मारहाण केली. या घटनेत कल्पेश झगडे याच्यावर काही तरी धारदार हत्याराने हल्ला करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.