नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोयत्याचा धाक दाखवित दहशत निर्माण करणा-या तरूणास पोलिसांनी गजाआड केले आहे. औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे भागात ही घटना घडली. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर उत्तम पवार (२३ रा.घरकुल योजना,चुंचाळे) असे संशयित कोयताधारीचे नाव आहे. घरकुलरोड भागात एक युवक कोयत्याचा धाक दाखवित दहशत निर्माण करीत असल्याची माहिती एमआयडीसी चुंचाळे पोलिस चौकीतील कर्मचाºयांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात धारदार कोयता मिळून आला.
संशयित अपना देशी दारू दुकान भागात आपला दबदबा राहवा यासाठी दहशत निर्माण करीत होता. याप्रकरणी अंमलदार सुरेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.