नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करणा-या शस्त्रधारी तरूणास पोलिसांनी गजाआड केले आहे. मयुर विवेकानंद वाघमारे (२६ रा. उत्सव हॉल जवळ, रोझा कॉलनी, मोटवाणी फॅक्टरी रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिकरोड परिसरातील मोटवाणी फॅक्टरी रोड भागात संशयिताच्या ताब्यातून धारदार कोयता हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आपल्या घर परिसरात कोयत्याच्या धाक दाखवत दहशत माजवित असल्याची माहिती शुक्रवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाव घेत त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या अंगझडतीत धारदार लोखंडी कोयता मिळून आला. याबाबत पोलिस कर्मचारी सुरज गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.