नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणार्कनगर भागात बहिणीसमवेत रस्त्याने पायी जाणा-या तरूणीची वाट अडवित एकाने शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना घडली. लतेश अग्रवाल (रा.पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे युवतीचा विनयभंग करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.
कोणार्क नगर भागात राहणा-या पीडितेचे नाव आहे. पीडिता गेल्या गुरूवारी (दि.२५) रात्री आपल्या बहिणीसमवेत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडली असता ही घटना घडली. दोघी बहिणी परिसरातील पाण्याच्या टाकी समोरील सयाजी पॅलेस इमारतीसमोरून पायी जात होत्या. त्याचवेळी संशयिताने वाट अडवित हे कृत्य केले. पिडीतेस संशयिताने अश्लिल शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.