नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विहीतगाव परिसरात औषधी गोळयांचे अतिसेवन केल्याने २१ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. वैशाली सुर्यकांत लोंढे (रा. भुटकीरोड, विहीतगाव ना.रोड) असे मृत युवतीचे नाव आहे. गेली दहा दिवस तरूणीवर उपचार सुरू होते. याप्रकरणी उपगनर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली लोंढे या तरूणीने गेल्या २९ एप्रिल रोजी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात औषधी गोळयांचे अतिसेवन केले होते. दुस-या दिवशी ती बेशुध्द अवस्थेत मिळून आल्याने भाऊ कानिफनाथ लोंढे यांनी तिला तत्काळ बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी (दि.९) सायंकाळी उपचार सुरू असतांना डॉ. उमंग अग्रवाल यांनी तिला मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.
बाथरुममध्ये चक्कर येऊन पडल्याने तरुण ठार….
जेलरोड परिसरातील भिमनगर भागात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. अनिल भगवान माळी (२८ रा. किर्तीमान सोसायटी, बेला डिसूझा रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिल माळी सोमवारी (दि.८) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडला होता. या घटनेत डोक्यास मार लागल्याने मित्र आकाश शिरसाठ याने त्यास बेशुध्द अवस्थेत तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
nashik-city-crime- Young Girl and Youth Death Accident