नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांनी गुरुवारी आत्महत्या केली. त्यातील एकीने गळफास लावून घेत तर दुसरीने विषारी औषध सेवन करून घेत आपले जीवन संपविले. दोघींच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना कामटवाडे शिवारात घडली. अनिता पंकज कोठे (३० रा. डीजीपीनगर, कामटवाडे) यांनी काही दिवसांपूर्वी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी उंदिर मारण्याचे विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ परिसरातील मयुर त्यानंतर उमा हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृर्तीत कुठलीही सुधारणा न झाल्याने त्यांना गेल्या शुक्रवारी (दि.१) मुंबई येथे हलविण्यात आले होते. खारघर येथील भारती विद्यापीठाच्या मेडीकव्हर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असतांना गुरूवारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत खारघर पोलिस ठाण्याचे शिपाई दिलीप चौरे यांनी कळविल्याने याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
दुस-या घटनेत सिडकोतील सावतानगर परिसरात राहणा-या मनिषा शंकर गायकवाड (३२ रा. सप्तशृंगी चौक) या विवाहीतेने गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी गजाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती शंकर गायकवाड यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Women Suicide Death