नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोन विवाहित महिलांनी सोमवारी आत्महत्या केली. दोघींच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना सिन्नर फाटा भागात घडली. संगिता रमेश गोतीस (५१ रा. केळकरवाडी, सिन्नरफाटा) यांनी सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरात छताच्या लाकडी अडगईला कपडा बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत सतिश गोतीस यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोत झाली. येथील जयश्री स्वप्निल घोरपडे (३८ रा.आदर्श अपा.महेश भुवन जवळ) यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्यास ओढळणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती स्वप्निल घोरपडे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.