नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काळाराम मंदिरात देवदर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या परप्रांतीय महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. या पर्समध्ये रोकडसह दागिणे होते. मंदिरातील गर्दीची संधी साधत चोरट्यांनी ७८ हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी अर्जुनाम्मा जगनमोहनराव पिनशेट्टी (३६ रा.तुमकापल्ली जि.विजयनगर,आंध्रप्रदेश) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुनाम्मा पिनशेट्टी या शुक्रवारी (दि.८) आपल्या कुटुंबियासह शहरात देवदर्शनासाठी आल्या होत्या. गोदाघाटावरील मंदिरामध्ये देवदर्शन घेवून त्या दुपारच्या सुमारास काळाराम मंदिरात गेल्या असता ही घटना घडली. महिला भाविकांच्या रांगेत त्या गर्दीतून देवदर्शनासाठी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक वाय.टी.वाडेकर करीत आहेत.
बाल्कनीतून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेला
हनुमाननगर भागात उघड्या बाल्कनीतून प्रवेश करून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी तुषार उत्तमराव बोरसे (२८ रा.बळी मंदिराशेजारी,हनुमाननगर) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि.६) रात्री ही घटना घडली. बोरसे कुटुंबिय झोपी गेले असता चोरट्यांनी घराच्या उघड्या बाल्कनीतून प्रवेश करून टेबलावर ठेवलेला सुमारे दहा हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Women Purse Laptop Theft