नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाहीतेचा छळ प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात पुणे येथील सासरच्या चार जणांविरूध्द मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरून दोन लाख रूपये आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून विवाहीतेचा छळ केला जात असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
पती अनिरूध्द दिक्षीत, सासू आशा दिक्षीत, जेठ अमोल दिक्षीत आणि जाऊबाई तेजश्री दिक्षीत (रा. आबासाहेब रायकर नगर, धायरी पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पंचवटी परिसरात राहणा-या विवाहीतेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित सासरच्या मंडळीकडून नोव्हेंबर २०१९ पासून तिचा छळ केला जात आहे.
माहेरून दोन लाख रूपये आणावेत या मागणीसाठी तिचा मानसिक व शारिरीक छळ केला असून गेल्या दीड वर्षापूर्वी संतप्त संशयितांनी तिला शिवीगाळ व मारहाण केल्याने पिडीतेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1655484301092458496?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1655509568997437441?s=20
nashik city crime Women Molestation Pune Family Booked