नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरासमोर उभ्या असलेल्या महिलेचा एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना वरचे चुंचाळे परिसरात घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीता गुरूवारी (दि.१७) रात्री आपल्या घरासमोर उभी असतांना अज्ञात अनोळखी व्यक्तीने तिच्याजवळ येवून काही कळण्याचा आत तिचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड करताच भामट्याने धुम ठोकली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक अपेक्षा जाधव करीत आहेत.
गुटख्याचा साठा करणारा ताब्यात
प्रतिबंधीत गुटख्याचा विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताच्या घरात सुमारे २५ हजार रूपये किमतीचा गुटखा आढळून आला असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल गणपत देवकर (३३ रा.सप्तशृंगी देवी मंदिरा समोर,ओढा रोड) असे संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिस नाईक निलेश काटकर यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयिताच्या घरात महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचा साठा असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१८) पोलिसांनी धाव घेत संशयिताच्या घरावर छापा टाकला असता हा साठा पोलिसांच्या हाती लागला. संशयितास ताब्यात घेत पोलिसांनी घरझडती घेतली असता एका गोणीत सुमारे २४ हजार ३३६ रूपये किमतीचा राज निवास नावाचा पान मसाला व प्रिमीयम जर्दा नावाचा सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.
Nashik City Crime Women Molestation Gutkha Seized