नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात महिला विनयभंगाचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही प्रकरणांमध्ये तर कुटुंबिय किंवा जवळच्या नातेवाईकांकडूनच महिलांचा विनयभंग होत असल्याचे सपष्ट होते. वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन महिलांचा शनिवारी (दि. ७) विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी इंदिरानगर, आडगाव आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाथर्डी शिवारात राहणाºया पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री पतीस झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गवळाणे – पाथर्डीरोडवरील साहिली अपार्टमेंटसमोर गेली असता दिनेश पोरजे (रा. पोरजेमळा, पाथर्डीगाव) याने विनयभंग केल्याचे म्हटले आहे. पोरजे याने श्रीमुखात भडकावित महिलेचा विनयभंग केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सय्यद करीत आहेत.
दुसरी घटना देवळाली कॅम्प येथील हाडोळा भागात घडली. डेव्हलपमेट एरियात राहणाºया महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महिला राहत असलेल्या परिसरातील फिरोज अजीज खान (४८) हा संशयित गेल्या अनेक दिवसांपासून महिला कामावर जातांना येतांना पाठलाग करतो. माझ्या घरी चल अशी म्हणत शरिरसुखाची मागणी करतो. शनिवारी सायंकाळी त्याने महिलेस गाठून विनयभंग करीत छेड काढल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक टी. एस. पवार करीत आहेत.
मोठ्या दिराने लहान भावजयीचा विनयभंग करत मारहाण केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या घरी बेडरूममध्ये झोपली असता तिचा दीर तेथे आला व त्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी महिलेने त्याला विरोध केला असता दिराने शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. महिलेचा भाऊमध्ये आला असता त्यालादेखील लाकडी दांडक्याने मारहाण करून घराच्या खिडक्या फोडल्या. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक पाथरे करत आहेत.