नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपनगर येथे रस्त्याने पायी जाणा-या महिलेची छेड काढीत टोळक्याने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली आहे.
सचिन मोरे, विठ्ठल मोरे व राहूल मोरे अशी महिलेचा विनयभंग करणा-या संशयित त्रिकुटाचे नाव आहे. परिसरातील पीडित महिला गेल्या ३० मे रोजी सरकारी दवाखान्यासमोरून पायी जात असतांना ही घटना घडली होती. वेल्डींग दुकानाजवळून जात असतांना संशयित त्रिकुटाने तिची छेड काढली. यावेळी पीडितेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी शिवीगाळ करीत तिला ढकलून देत विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.दरम्यान उपनगर पोलिस ठाणे हद्दीत टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून भामट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महिलावर्गातून होत आहे.
भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धा ठार
जुना गंगापूरनाका ते केटीएचएम कॉलेज दरम्यान भरधाव दुचाकीने धडक दिल्याने ७५ वर्षीय वृध्द महिला ठार झाली. रूख्मिणी जीयामल धिरवाणी (रा.ओम बंगलो, लोकमान्यनगर, गंगापूररोड) या मंगळवारी (दि.४) सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली होती. दुचाकीचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जून्या गंगापूर नाक्याकडून त्या केटीएचएम महाविद्यालयाच्या दिशेने धिरवाणी पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ मुंबईनाका येथील क्रोमा सेंटर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असतांना बुधवारी डॉ. सचिन बंगाळे यांनी त्यांना मृत घोषीत केले.
याबाबत पोलिस नाईक शेवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोटारसायकल चालकाविरोधात पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करम्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.