नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोड भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित वीज वितरण कंपनीतील कर्मचारी असल्याचे कळते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज संतू फुगे असे संशयिताचे नाव आहे. २६ वर्षीय विवाहीतेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे परिचीत असून मंगळवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास महिला पेठरोडवरील सप्तरंग परिसरातून पायी जात असतांना संशयिताने तिचा पाठलाग केला. यावेळी महिलेस गाठून संशयिताने दमदाटी करीत विनयभंग केला. अधिक तपास हवालदार विलास भोज करीत आहेत.