नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर परिसरात महिलांच्या विनयभंगाचे प्रकार आता रोजचेच झाले आहे. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. निलगीरीबाग भागात प्रवासी महिलेबरोबर भाडे देण्याच्या कारणातून वाद घालून तिचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलिसांनी गजाआड केले आहे.
सिध्दांत प्रकाश वंजारी (२३ रा.दत्त मंदिराजवळ बिडी कामगार नगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ती संशयिताच्या अॅटोरिक्षातून प्रवास करीत होती. निलगीरी बाग पाटाजवळ तिने रिक्षा थांबवून उतरली असता ही घटना घडली. संशयिताने जास्त भाड्याची मागणी केल्याने दोघांत वाद झाला. यावेळी संशयिताने अश्लिल शिवीगाळ व दमदाटी करीत महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.